ऑकलंड: भारतीय संघाचा कर्णधार त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. विराटचा हा आक्रमकपणा काही वेळा मैदानाबाहेर देखील दिसतो. भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यातील पहिला टी-२० सामना शुक्रवारी होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका झाल्यानंतर भारतीय संघ एका आठवड्यात न्यूझीलंडमध्ये खेळण्यात दाखल झाला. क्रिकेटमधील या व्यग्र नियोजनावर विराट भडकला.

पाच दिवसांपूर्वी भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली. बेंगळुरू येथे झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघ तेथूनच थेट न्यूझीलंडसाठी रवाना झाला. एकापाठोपाठ एक मालिका खेळाव्या लागत असल्याबद्दल विराटने नाराजी व्यक्त केली. आता आपण अशा परिस्थितीच्या जवळ पोहोचलो आहोत की संघाला सामना खेळण्यासाठी विमानाने थेट मैदानावर उतरावे लागले. क्रिकेटचे नियोजन इतके व्यग्र झाल्याचे विराट म्हणाला.

वाचा-

इतका मोठा प्रवास करून वेगळी प्रमाणवेळ असेलल्या देशात पटकन मिसळून जाणे अवघड असते. मला आशा आहे की भविष्यात या गोष्टींकडे लक्ष दिले जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियोजन अतिशय व्यग्र असल्याचे विराटने सांगितले.

वाचा-

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत आम्हाला मैदानात सराव करता आला. त्याआधी काही टी-२० मालिकेत देखील वेळ मिळाला होता. न्यूझीलंडमध्ये क्रिकेटपटूंना इतके क्रिकेट खेळावे लागत नाही. या देशात खेळ थोडा निवांतपणे खेळला जातो. न्यूझीलंड दौऱ्यावर थोडा निवांतपणा मिळतो. न्यूझीलंडमध्ये क्रिकेटकडे काम म्हणून पाहिले जाते आणि त्याचे फार ओझ घेतलं जात नाही. न्यूझीलंडच्या संस्कृतीचा हा भाग आहे. येथे क्रिकेट हा केवळ एक खेळ आहे, असे विराट म्हणाला.

वाचा-

पण न्यूझीलंडचा संघ प्रत्येक सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरतो. न्यूझीलंडमध्ये गोष्टी बऱ्याच प्रमाणात संतुलित आहेत आणि येथे खेळण्यास आवडते, असे तो म्हणाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here