मेलबर्न: मुलाला जन्म दिल्यानंतर टेनिस कोर्टवर दाखल झालेल्या भारताच्या सानिया मिर्झाला वर्षातील पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मंगळवारी सुरू असलेल्या सामन्यात दुखापतीमुळे सानियाला माघार घ्यावी लागली.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत सानिया तिची युक्रेनची जोडीदार नादिया किचेनोक सोबत खेळत होती. या दोघींचा मुकाबला चीनच्या शिंयुआन हान आणि लिन झू जोडीविरुद्ध सुरू होता. सामन्यात सानिया-नादिया जोडी २-६, ०-१ने पिछाडीवर असताना खेळ थांबवण्यात आला. सानियाच्या उजव्या पायाला दुखापत झाली.

वाचा-

दोन वर्षानंतर टेनिस कोर्टवर परतलेल्या सानियाने गेल्याच आठवड्यात होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. ऑस्ट्रेलियन ओपनच्या सामन्याआधी सराव करताना सानियाला दुखपत झाली होती. जेव्हा सामना थांबवण्यात आला तेव्हा चीनच्या जोडीने सानिया-नादिया यांची सर्व्हिस ब्रेक केली होती. पण दुखापतीमुळे ती खेळू शकली नाही. सानियाने पहिल्या सेटनंतर वैद्यकीय ब्रेक देखील घेतला होता.

वाचा-

दुसऱ्या सेटच्या पहिल्या गेममध्येच सानिया-नादियाची सर्व्हिस ब्रेक झाली आणि त्यांना पुढे सामना खेळता आला नाही. सानिया-नादियाला फक्त सामना सोडावा लागला नाही तर स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. सानियाला मिश्र दुहेरीतून देखील माघार घ्यावी लागली. मिश्र दुहेरीत सानिया भारताच्या रोहन बोपन्नासोबत खेळणार होती.

वाचा-

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आता भारताच्या आशा लिंएडर पेसकडून आहेत. पुरुष दुहेरीत पेस आणि त्याचा जोडीदार येलेना ओस्टापेंको सोबत खेळणार आहे. या दोघांचा पहिला मुकाबला ऑस्ट्रेलियाच्या स्टोर्म सॅडर्स आणि मार्क पोलमॅस यांच्याविरुद्ध होणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here