मुंबई: क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम होतात तसेच अनेक रंजक घटना देखील घडतात. पण अशाच रंजक आणि गंमतीशीर घटना मैदानाबाहेर संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये देखील होत असतात. असे किस्से संबंधीत संघातील खेळाडूंनाच माहीत असतात. असाच एक किस्सा ज्याबद्दल आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हते तो सांगितला भारताचे माजी क्रिकेटपटू यांनी…

दोनच दिवसांपूर्वी मुंबईचे माजी क्रिकेटपटू यांची सुनील गावस्कर यांनी वाळकेश्वर येथील घरी भेट घेतली. रायजी या २६ जानेवारीला वयाचे शतक पूर्ण करत असल्यामुळे गावस्कर यांनी त्यांना भेटून खास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनी क्रिकेटमधील अनेक आठवणींना उजाळा दिला. रायजी यांच्यासोबत एक आठवण शेअर करताना गावस्कर म्हणाले, ‘मुंबईच्या रणजी संघात फक्त दोन गुजराती बोलणारे खेळाडू होते. संघातील अन्य खेळाडू मराठी होते. पण असे असेल तरी ड्रेसिंगरूममधील भाषा मात्र मराठी ऐवजी गुजराती होती. याचे कारण म्हणजे मुंबईकडून खेळणारे पण गुजराती बोलणारे अशोक मांकड हे मराठी इतके भयानक पद्धतीने बोलायचे की भाषेची हत्याच व्हायची. त्यामुळे आम्ही सर्व जण अशोक यांना सांगायचो की तू मराठी बोलू नको. आम्ही गुजरातीमध्ये बोलतो. त्यामुळे मुंबई संघाची ड्रेसिंग रूमधील भाषा गुजराती होती. गावस्कर यांनी सांगितलेल्या घटानंतर रायजी देखील हसू आवरले नाही’.

वाचा-

रायजी यांनी देखील सी.के. नायडू, विजय मर्चंट, वेस्ली हॉल, फ्रँक वॉरेल, डॉन ब्रॅडमन, लाला अमरनाथ, गॅरी सोबर्स अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या आठवणी सांगितल्या.

रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द दीर्घ नव्हती. स्थानिक क्रिकेटमध्ये ते काही काळ खेळले खरे, पण त्यांना लेखनाची प्रचंड हौस होती. ती आवड जोपासताना त्यांनी जवळपास ३०० पुस्तके लिहिली. त्यातील काही आज त्यांच्या घरी ठेवलेली आहेत. ती पुस्तकेही गावस्कर यांनी आवडीने चाळली. गावस्कर यांनीही पाच पुस्तके लिहिली आहेत. लिहिण्यामुळे क्रिकेटशी असलेले नाते आणखी मजबूत झाल्याचे गावस्कर म्हणाले.

वाचा-

शाळेत असताना क्रिकेटमध्ये कोणी हिरो होते? असा प्रश्न रायजी यांनी गावस्करांना विचारला. त्यावर गावस्कर म्हणाले, मी शाळेत असताना विजय मर्चंट हे माझे आदर्श होते. माझे मामा माधव मंत्री यांनी त्यांच्यासोबत खेळल्याचे गावस्करांनी सांगितले.

रायजी यांच्या या उत्तम प्रकृतीचे रहस्य कशात लपले असेल, असे विचारल्यावर गावस्कर म्हणाले की, आहार, व्यायाम, शिस्तप्रियता यांचा परिपाक म्हणजे दीर्घायुष्य आहे. मला आठवते की, माझे मामा माधव मंत्री हे स्वतः वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होते. सकाळी सहा वाजता ते व्यायामाला सुरुवात करत आणि प्रत्येक काम हे वेळेवरच करत. त्याबाबत त्यांना दिरंगाई खपत नसे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here