चेन्नई: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. या काळात धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने वार्षिक करारातून देखील त्याला वगळले होते. त्यामुळे धोनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार का याबद्दल शंका उपस्थित होत होती. पण धोनीने भारतीय संघासाठी खेळणे आवश्यक आहे, असे मत एका दिग्गज माजी खेळाडूने व्यक्त केले आहे.

धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यास भारतीय संघाचे मोठे नुकसान होईल, असे मत भारताचे महान कर्णधार यांनी व्यक्त केले आहे. धोनी जेव्हा केव्हा निवृत्ती घेईल तेव्हा ते संघासाठी नुकसानकारक असेल. २००४मध्ये भारतीय संघाकडून खेळण्यास सुरूवात करणऱ्या धोनीने काही काळातच सर्वोत्तम मॅच विनर म्हणून स्वत:चे स्थान पक्के केल्याचे देव म्हणाले.

वाचा- धोनी जेव्हा संघात आला तेव्हा त्याला एक विकेटकीपर आणि एक सर्वसाधारण फलंदाज म्हणून स्थान मिळाले होते. पण त्यानंतर धोनीने वनडे आणि टी-२०मधील सर्वोत्तम मॅच फिनिशर असल्याचे सिद्ध केले.

फलंदाजीसाठी खालच्या क्रमांकावर येवून देखील धोनीने वनडे क्रिकेटमध्ये १० हजार धावा केल्या आहेत. टी-२०मध्ये त्याने दमदार रेकॉर्ड केले आहेत, असे कपील देव म्हणाले.

भारताला टी-२०, आयसीसी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी आयपीएलमध्ये खेळणार आहे. IPL मधील धोनीच्या कामगिरीवर तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे की नाही यााबद्दलचा निर्णय होईल.

पंत दुसऱ्यांना दोष देऊ शकत नाही…

खराब कामगिरीसाठी पंत दुसऱ्यांना दोष देऊ शकत नाही, असे मत कपील देव यांनी व्यक्त केले. ऋषभ पंतकडे क्षमता आहे. पहिल्या काही सामन्यात पंतने शानदार कामगिरी केली होती. नंतर मात्र विकेटच्या मागे आणि फलंदाजीत देखील त्याला अपयश आले. त्याच्याकडे क्षमता आहे. तो अन्य कोणाला दोषी ठरवू शकत नाही. त्याला स्वत:चे करिअर स्वत: घडवावे लागले. चांगली कामगिरी करून टीकाकारांना उत्तर द्यावे लागेल, असे कपील देव म्हणाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here