ऑकलंड: भारताचा कर्णधार हा उत्तम फलंदाज आहे. संघाला अनेक सामन्यात विराटने स्वत:च्या खेळीने जिंकून दिले आहे. विराट हा जसा उत्तम फलंदाज आहे तसा तो उत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे. विराटने आतापर्यंत अनेक अफलातून कॅच पकडले आहेत. पण रविवारी ऑकलंड येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विराटला त्याने केलेल्या क्षेत्ररक्षणामुळे चेहरा लपवावा लागला.

न्यूझीलंडच्या डावात १८व्या षटकात गोलंदाजी करत होता. बुमराहचा ११८ किलो मीटर वेगाने टाकलेला चेंडू रॉस टेलरने उंच हवेत मारला. लॉग ऑनवर मारलेला हा चेंडू विराटच्या हातात जाणार होता. विराटने गुढघ्यावर बसून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला धरता आला नाही. अशा प्रकारे कॅच घेण्याला ऑस्ट्रेलियन पद्धत म्हणतात. कॅच सोडल्यानंतर विराटला देखील विश्वास बसला नाही.

वाचा-

त्यानंतर विराटने रागात चेंडू विकेटकीपर राहुलकडे फेकला. पण तो देखील राहुलच्या डोक्यावरून थेट फाइन लेगकडे केला. अर्थात तेथे मोहम्मद शमी उभा असल्याने ओव्हर थ्रो झाला नाही. शमी त्या ठिकाणी नसता तर अतिरिक्त ४ धावा गेल्या असत्या. या घटनेनंतर विराटने दोन्ही हाताने चेहराच लपवला.

दोन कॅच पकडले

रॉस टेलरचा कॅच सोडण्याआधी विराटने शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर मार्टिन गप्टिलचा तर शिवम दुबेच्या चेंडूवर कॉलिन मुन्रोचा कॅच पकडला. गप्टिलचा कॅच सोपा होता. पण मुन्रोचा कॅच विराटने पुढच्या बाजूस उडी मारून घेतला.

वाचा-

भारताचा सलग दुसरा विजय

प्रथम गोलंदाजांनी आणि त्यानंतर फलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरी टी-२० सामना ७ विकेटनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या टी-२० भारताने ६ विकेटनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने भारताला १३३ धावांचे आव्हान दिले होते.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १३३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यात देखील हिटमॅन रोहीत शर्मा लवकर बाद झाला. रोहितने ८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला देखील मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ११ धावा करून बाद झाला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था २ बाद ३९ अशी होती. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची संयमी भागिदारी केली. भारतीय संघ विजयाच्या जवळ आला असताना श्रेयस ४४ धावांवर बाद झाला. दरम्यान राहुलने टी-२०मधील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर राहुल आणि शिवम दुबे यांनी विजयाची औपचारीकता पूर्ण केली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here