मुंबईकडून १९४०च्या दशकात रायजी यांनी ९ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी २७७ धावा केल्या. ६८ ही त्यांची सर्वोच्च खेळी होती. रायजी १३ वर्षाचे असताना भारताने मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. रायजी यांना भारतीय क्रिकेटचा संपूर्ण इतिहास माहित आहे. त्यांनी मुंबई आणि बडोदरा संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
वाचा- लासचिन तेंडुलकरने रायजी यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांची भेट घेतली. त्यानंतर केक देखील कापला. सचिनने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्हाला १००व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा श्री वसंत रायजी. स्टीव आणि मला तुमच्या सोबत काळ घालवता आला. तुमच्याकडून क्रिकेटमधील अनेक आठवणींना उजाळा मिळाला. आपल्या या आवडत्या खेळाच्या आठवणी पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे आभार, असे सचिनने ट्विटरवर म्हटले आहे.
वाचा-
लाला अमरनाथ, विजय मर्चेंट, सीके नायडू आणि विजय हजारे यांच्यासोबत रायजी खेळले आहेत. रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द दीर्घ नव्हती. स्थानिक क्रिकेटमध्ये ते काही काळ खेळले खरे, पण त्यांना लेखनाची प्रचंड हौस होती. ती आवड जोपासताना त्यांनी जवळपास ३०० पुस्तके लिहिली. त्यातील काही आज त्यांच्या घरी ठेवलेली आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times