कोबीने १८ वेळा एनबीएचा ऑल स्टार हा किताब मिळवला होता. तर २००८मध्ये एनबीएचा सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले होते. त्याने एनबीए फायनलमध्ये एमव्हीपी का किताब दो वेळा मिळवला. २००८ बिजिंग आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. २००६ मध्ये टोरांटो रॅपटर्सविरुद्धच्या सामन्यात कोबीने एका सामन्यात ८१ गुण मिळवले होते. त्याच्या करिअरमधील ही सर्वोत्तम खेळी होती.
वाचा-
एक प्रेम पत्र आणि जिंकला ऑस्कर पुरस्कार
कोबीने २०१५ मध्ये बास्केटबॉलला एक प्रेम पत्र लिहले होते. या प्रेम पत्रावरून डिअर बास्केटबॉल हा एक शॉट अॅनिमेटेड चित्रपट तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ठ अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला होता.
पाहा कोबीचा ऑस्कर विजेता चित्रपट…
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times