ऑकलंड: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी-२० सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या दोन्ही सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. धावांचा यशस्वी पाठलाग कसा करायचा हे कर्णधार विराट कोहलीकडूनच शिकल्याचे श्रेयसने सांगितले.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रेयसने ३३ चेंडूत ४४ धावा केल्या. भारताच्या विजयात श्रेयसची खेळी महत्त्वाची होती. या विजयानंतर श्रेयसने विराट कोहलीच्या पावलावर चालत असल्याचे सांगितले. श्रेयसने दुसऱ्या टी-२० मध्ये केएल राहुल सोबत तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा आणि बाद झाल्यानंतर भारतीय संघाला विजयाच्या जवळ पोहोचवण्यात या जोडीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. या दोघांमुळे भारताने १३३ धावांचे लक्ष्य १५ चेंडू राखून पार केले.

वाचा-

पहिल्या सामन्यात श्रेयसने शानदार खेळी करत विजय मिळवून दिला होता. त्याच्या २९ चेंडूतील नाबाद ५८ धावांच्या जोरावर भारताने २०४ धावांचे आव्हान ६ चेंडू राखून पार केले. दोन्ही सामन्यातील श्रेयसच्या या खेळीमुळे भारताला मालिकेत २-० अशी आघाडी तर घेता आलीच त्याचबरोबर संघातील चौथ्या क्रमांकाचा प्रश्न मिटण्याची शक्यता दिसत आहे.

वाचा-

जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला माहिती असते की किती वेगाने धावा करायच्या आहेत. विराट कोहली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तो जेव्हा फलंदाजीला उतरतो तेव्हा धावा कशा करायच्या याचे नियोजन असते. मी विराटकडूनच धावांचा पाठलाग कसा करायचा हे शिकलो आहे, असे श्रेयस म्हणाला. त्याच बरोबर रोहित शर्माकडून देखील खुप काही शिकायला मिळाला आहे. संधीचा कसा फायदा घ्यायचा हे रोहितकडून कळाले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here