मुंबई: हळूहळू प्रतिस्पर्धी संघासाठी कर्दनकाळ बनत चालला आहे. प्रतिस्पर्धी संघाला निर्दयीपणे पराभूत करत असल्याचे ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरने म्हटले आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा दुसऱ्या टी-२० सामन्यात दणदणीत पराभव केला. त्यानंतर अख्तरने आपले मत व्यक्त केले.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या युट्युब चॅनेलवर भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील दुसऱ्या टी-२० सामन्याचे विश्लेषण केले आहे. टीम इंडिया निर्दयी होत चालली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात याचे प्रतिबिंब दिसते. न्यूझीलंडचा संघ कमी धावसंख्या उभारत असेल तर मजबूत फलंदाजीची फळी असलेल्या भारतीय संघाचा प्रतिकार कसा करू शकतात, असेही अख्तरने म्हटले आहे.

क्रिकेटमध्ये हळूहळू प्रतिस्पर्धी संपत चालले असल्याचे म्हणत सध्या भारतीय संघाचा क्रिकेट जगतात दबदबा आहे. मात्र, दुसऱ्या इतर संघाना नेमकं काय झालंय असा प्रश्नही अख्तरने विचारला आहे. ऑस्ट्रेलियाचा दबदबा असताना कमीत कमी भारत, पाकिस्तान किमान त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न तरी करायचे. यजमान न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघासमोर शरणागती पत्करली असल्याचे त्याने म्हटले.

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेतील तिसरा सामना २९ जानेवारी रोजी हॅमिल्टन येथे होणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here