विराटने जिममधील वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो एक स्टंट करत असल्याचे दिसत आहे. जिममध्ये विराटच्या समोर दोन बॉक्स ठेवले आहेत. विराट त्या बॉक्सवर उडी मारताना पाहायला मिळते. विराटच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. क्रिकेटपटू हरभजन सिंगने देखील विराटच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा-
विराटने याआधी देखील अनेक वेळा जिममधील व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. विराटच्या मैदानावरील शानदार कामगिरीचे एक महत्त्वाचे कारण त्याचा फिटनेस असल्याचे मानले जाते.
वाचा-
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना उद्या होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताला मालिका जिंकण्याची संधी आहे. इडन पार्कवर झालेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा पराभव केला होता. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले २०४ धावांचे आव्हान भारताने ६ चेंडू राखून तर दुसऱ्या सान्यात १५ चेंडू आणि ७ विकेट राखून पार केले होते. आता हॅमिल्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच विराट आणि कंपनीचा प्रयत्न असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times