विक्रमी २१ व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठी कोर्टवर उतरलेल्या फेडररला १००व्या रँकिंगच्या सँडग्रेनने पाच सेटपर्यंत झुंजवले. ३ तास ३१ मिनिटे चालेल्या या सामन्यात फेडररने ६-३, २-६, २-६, ७-६(८) आणि ६-३ अशा सेटमध्ये विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची फेडररची ही १५वी वेळ आहे. याआधी तो २०१८ साली अंतिम ४ मध्ये पोहोचला होता.
मंगळवारी दुसरी उपांत्य पूर्व लढत सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि कॅनडाचा मिलोस राओनिक यांच्यात होईल. जोकोविच आणि राओनिक यांच्यातील विजेता उपांत्य फेरीत फेडररशी लढेल. जोकोविचसाठी ही लढत सोपी मानली जात आहे. तसे झाले तर उपांत्य फेरीत फेडरर विरुद्ध जोकोविच अशी लढत पाहायला मिळेल.
उपांत्य फेरीत गेल्यावर काय म्हणाला फेडरर
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times