बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या द्वितीय श्रेणीतील एका सामन्यात फलंदाजांनी ४८ षटकार आणि ७० चौकार मारले. या वादळी खेळीमुळे सामन्यात ८१८ धावा झाल्या. नॉर्थ बंगाल अकादमी विरुद्ध टॅलेंट हंट क्रिकेट अकादमी यांच्यात हा सामना झाला. नॉर्थ बंगालने या सामन्यात ४६ धावांनी विजय मिळवला.
वाचा-
नॉर्थ बंगालने प्रथम फलंदाजी करत चार विकेटच्या बदल्यात ४३२ धावा केल्या. उत्तरादाखल टॅलेंट हंट संघाला सात विकेटच्या बदल्यात ३८६ धावांपर्यंत मजल मारता आली. नॉर्थच्या फलंदाजांनी २७ षटकार तर विरोधी संघाने २१ षटकार मारले.
वाचा-
बांगलादेशमधील स्थानिक क्रिकेट सामन्यात अनेकवेळा अनपेक्षित निकाल लागतात. त्यामुळेच येथील सामन्यात फिक्सिंगचा देखील आरोप केला जातो. मी अनेक वर्ष स्थानिक क्रिकेट पाहत आहे. पण याआधी असे कधीच झाले नसल्याचे क्रिकेटपटू सैयद अली इसाफ यांनी सांगितले.
वाचा-
स्थानिक क्रिकेटमध्ये फिक्सिंगची घटना सामान्य आहे. २०१७ साली झालेल्या सामन्यात एका गोलंदाजाने वाइड आणि नोबॉल टाकत ९२ धावा दिल्या होत्या. नंतर त्यावर १० वर्षांची बंदी घालण्यात आली. स्थानिक क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. अंपायर्सवर देखील फिक्सिंगचे आरोप झाले आहेत.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times