नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने २३३ धावांवर रोखले होते. पण भारताच्या युवा ब्रिग्रेडने शानदार कामगिरी करत ७४ धावांनी विजय मिळवला. स्पर्धेत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. आता सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होण्याची शक्यता आहे.

वाचा-

मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेत नवव्यांदा पराभव केला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताची सुरूवात खराब झाली ११४ धावांवर भारताने ५ विकेट गमवल्या होत्या. ५० षटकात भारताने ९ बाद २३३ धावा केल्या. भारताकडून यशस्वी जैस्वालने ६२ धावा केल्या. २३४ धावांचे छोटे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची भारतीय गोलंदाजांनी दाणादाण उडवली. कार्तिक त्यागीने तीन विकेट घेत कंगारूंचा पराभव निश्चित केला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६८ धावांवर ५ विकेट गमावले होते. त्यानंतर सॅमने ७५ धावा करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा सामन्यात आणले. पण आकाश सिंहने त्याला बाद करत भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला.

वाचा-

भारत-पाकिस्तान पुन्हा लढणार

अन्य एका उपांत्य पूर्व लढतीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ही स्पर्धेतील चौथी उपांत्य पूर्व लढत असेल. पहिली उपांत्य पूर्व लढत भारताने जिंकली आहे. उपांत्य पूर्व फेरीतील पहिल्या आणि चौथ्या संघामध्ये उपांत्य फेरीत लढत होईल. जर पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीतील लढत होऊ शकते.

वाचा-

स्पर्धेतील दुसरा उपांत्य पूर्व फेरीतील सामना न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज तर तिसरा सामना बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांचा होणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

  1. It’s the same topic , but I was quite surprised to see the opinions I didn’t think of. My blog also has articles on these topics, so I look forward to your visit. safetoto

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here