न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विराटने २५वी धावा घेत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला मागे टाकले. टी-२०मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर होता. धोनीने कर्णधार म्हणून १ हजार ११२ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत धोनी तिसऱ्या स्थानावर होता. या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन १ हजार १४८ धावांसह दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस १ हजार २७३ धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
वाचा-
विराटने तिसऱ्या सामन्यात २५ धावा करत टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला. तर क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा कर्णधार झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यातील पहिला टी-२० सामना भारताने ६ विकेटनी तर दुसरा सामना ७ विकेटनी जिंकला होता.
हिटमॅन रोहितचा विक्रम
रोहितने तिसऱ्या सामन्यात २३ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह अर्धशतक केले. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून त्याच्या १० हजार धावा पूर्ण झाल्या. रोहितच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी आतापर्यंत फक्त तिघा भारतीय क्रिकेटपटूंनी केली होती.
रोहितच्या विक्रमाची संपूर्ण बातमी वाचा-
भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि विरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून १० हजार धावा केल्या आहेत. गावस्कर यांनी ओपनर म्हणून १२ हजार २५८, विरेंद्र सेहवागने १६ हजार ११९ तर सचिन तेंडुलकरने १५ हजार ३१० धावा केल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times