बेनोनी : १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ६ विकेट्सने मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. आता उपांत्य फेरीत पाकिस्तानची गाठ बलाढ्य भारताशी पडणार आहे. ४ फेब्रुवारीला ही लढत होणार आहे. दुसरा उपांत्य सामना बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात ६ फेब्रुवारीला होईल.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४९.१ षटकांत १८९ धावा केल्या. त्यात फरहान झखीलने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर तळाचा फलंदाज अब्दुल रहमानने ३० धावा केल्या. अफगाणिस्तानच्या या धावसंख्येला उत्तर देताना पाकिस्तानची अवस्था ४ बाद १२७ अशी झाली होती. त्यात मोहम्मद हुरेराने ६४ धावांची खेळी केली. नंतर कासीम अक्रम (२५) आणि मोहम्मद हारिस (२९) यांनी पाचव्या विकेटसाठी ६२ धावांची अभेद्य भागीदारी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. स्कोअरबोर्ड : अफगाणिस्तान ४९.१ षटकांत १८९ (फरहान झखील ४०, अब्दुल रहमान ३०, मोहम्मद आमीर खान ५८-३) पराभूत वि. पाकिस्तान ४१.१ षटकांत ४ बाद १९० (मोहम्मद हुरेरा धावचीत ६४, कासीम अक्रम २५, मोहम्मद हारिस २९). उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास भारत वि. श्रीलंका (९० धावांनी विजय) वि. जपान (१० विकेट्सनी मात) वि. न्यूझीलंड (४४ धावांनी विजय) वि. ऑस्ट्रेलिया (७४ धावांनी मात) पाकिस्तान वि. स्कॉटलंड (७ विकेट्सनी विजय) वि. झिम्बाब्वे (३८ धावांनी विजयी) वि. बांगलादेश (निकाल नाही) वि. अफगाणिस्तान (६ विकेट्सनी विजय)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here