ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत शुक्रवारी सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात एक अजब प्रकार उघडकीस आला. सिडनी सिक्सर्सकडून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार फलंदाजी करत होता. मेलबर्न स्टार्सकडून पाकिस्तानचा जलद गोलंदाज हारिस राउफने स्मिथला चेंडू टाकला. राउफचा बाऊसर चेंडू स्मिथने सोडला आणि तो विकेटकीपरकडे गेला.
वाचा-
त्यानंतर मेलबर्नचे खेळाडू स्मिथ बाद झाल्याचा आनंद साजरा करू लागले. कारण विकेटवरील बेल्स पडल्या होत्या. मैदानावर नेमके काय घडले हे कोणाला कळाले नाही. व्हिडिओमध्ये स्मिथ हिटविकेट झाल्याचे वाटत होते. पण रिप्ले पाहिल्यानंतर हवेमुळे विकेटवरील बेल्स पडल्याचे समजले. स्मिथच्या शरीराचा किंवा चेंडूचा कोणताही भाग विकेटला लागला नव्हता. रिप्ले पाहिल्यानंतर स्मिथ नॉट आउट असल्याचे थर्ड अंपायरने जाहीर केले.
बिग बॅश लीगने अधिकृत ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. हिट विकेट, असे तुम्हाला वाटेल पण हवेने स्टीव्ह स्मिथला बाद केले, असे बीबीएलने म्हटले आहे.
अर्थात या सामन्या स्मिथला काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने १८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह २४ धावा केल्या. मेलबर्नमध्ये झालेल्या या सामन्यात सिडनी सिक्सर्सने ४३ धावांनी विजय मिळवला. सिडनीने ७ बाद १४२ धावा केल्या. मेलबर्न संघ १८ षटकात ९९ धावांवर बाद झाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times