नवी दिल्ली: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. दुखापतीमधून बाहेर आलेला हार्दिक अद्याप फिट नसल्यामुळे तो आगामी वनडे पाठोपाठ कसोटी मालिका खेळू शकणार नाही. यासंदर्भातील माहिती शनिवारी बीसीसीआयने दिली.

मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये यूएईत झालेल्या आशिया कप स्पर्धेत खेळताना एका सामन्यादरम्यान हार्दिकच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यातून तो बरा झाला आणि २०१९ च्या विश्वचषकात खेळलाही. मात्र, आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेदरम्यान त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढले. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

वाचा-

दुखापतीतून बाहेर आल्यानंतर हार्दिकची भारतीय अ संघात निवड करण्यात आली होती. पण हार्दिक फिट नसल्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० आणि वनडे संघासाठी देखील त्याचा विचार केला गेला नव्हता. आता कसोटी मालिकेला देखील तो मुकणार आहे. या महिन्याच्या अखेरीस भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

वाचा-

हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. तो लंडनला जाणार आहे. त्याच्या सोबत राष्ट्रीय अकादमीचे फिजिओ आशीष कौशिक देखील लंडनला जाणार आहेत. तेथे डॉक्टर जेम्स आलीबोन यांची भेट घेऊन तो दुखापतीसंदर्भात पुढील तपासणी करणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

वाचा-

गेल्या वर्षी लंडनमध्ये हार्दिकवर शस्त्रक्रिया झाली होती. विश्रांतीनंतर तो पुन्हा एकदा मैदानावर सरावासाठी उतरला होता. पण फिटनेस टेस्ट पार न केल्याने त्याला भारतीय संघातून बाहेर व्हावे लागले. त्याच्या ऐवजी विजय शंकरची भारतीय अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली.

हार्दिकने सप्टेंबर २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here