कोल्हापूर : स्वतंत्र भारताच्या इतिहासात १९५२ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेला खास असे महत्त्व आहे. फिनलंडमधील हेलसिंक येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या यांनी देशाला पहिले वैयक्तिक पदक जिंकून दिले. खाशाबा यांच्या या पदकानंतर अनेक वर्ष भारताला वैयक्तिक पदक जिंकता आले नव्हते. देशाचा तिरंगा सर्वात प्रतिष्ठेच्या अशा स्पर्धेत फडकावण्याची कामगिरी खाशाबा यांनी केली. पण या कामगिरीनंतर सरकारी पातळीवर त्यांच्या पदरी निराशाच आली.

वाचा-

देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा यांना अद्याप पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले नाही. बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माती एकता कपूरला पद्मश्री पुरस्कार मिळतो पण माझ्या बाबांचा सन्मान का होत नाही? असा सवाल खाशाबा जाधव यांचे पुत्र यांनी केला. जाधव यांनी खाशाबा यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी केली.

वाचा-

पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यासारखे असे कोणते काम एकता कपूरने केले आहे. तिने कोणते सामाजिक काम केले आहे ज्यामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला, असा सवाल रणजीत जाधव यांनी केंद्र सरकारला विचारला.

वाचा-

खाशाबा जाधव यांचे निधन १९८४ साली झाले. त्यानंतर १७ वर्षांनी त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सरकारने नेहमीच खाशाबा जाधव यांची उपेक्षा केल्याची खंत रणजीत जाधव यांनी बोलून दाखवली.

वाचा-

देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या जाधव यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी अनेक वेळा संसदेत याची मागणी केली. पण केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रणजीत जाधव यांनी केला. राज्यातील खासदारांनी केंद्र सरकारकडे खाशाबा जाधव यांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करावा असे ते म्हणाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here