दुबई: भारतीय क्रिकेटचा संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. विराटने पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम फलंदाजाचे स्थान स्वत:कडे राखले. तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची मात्र नवव्या स्थानावर घसरण झाली. ९२८ अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ असून तो विराटपेक्षा १७ गुणांनी मागे आहे.

वाचा-

क्रमवारीत भारताचा मधल्याफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा ७९१ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर नवव्या स्थानावर असलेल्या रहाणेकडे ७५९ गुण आहेत.

वाचा-
भारतीय गोलंदाजांचा विचार केल्यास पहिल्या दहामध्ये तिघांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह आठव्या, मोहम्मद शमी नवव्या तर आर अश्विन सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रविंद्र जडेजा ४०६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अश्विनच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. तो आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here