न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात ऋषभ पंतला स्थान न दिल्याबद्दल सेहवागने नाराजी व्यक्त केली. सेहवागने महेंद्र सिंह धोनीच्या काळात खेळाडू सोबत संवाद केला जात नसल्याचा आरोप केला. धोनी कधीच खेळाडूंशी बोलायचा नाही. तो गोष्टी पत्रकार परिषदेत सांगायचा आणि आम्हाला गोष्टी मीडियाकडून समजायच्या, असे सेहवागने सांगितले.
वाचा-
धोनीने ऑस्ट्रेलियात २०१२ मध्ये सांगितले होते की, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या टॉप ऑर्डरमध्ये रोटेशन ठेवले जाणार आहे. कारण हे तिघे फिल्डिंगमध्ये स्लो आहेत. धक्कादायक म्हणजे ही गोष्ट आम्हाल कधीच डेसिंग रुममध्ये सांगण्यात आली नाही. ती आम्हाला मीडियातून कळाल्याचे सेहवाग म्हणाला.
वाचा-
आमच्यावेळी कर्णधार प्रत्येक खेळाडूशी बोलायचा. मला माहिती नाही सध्या विराट कोहली खेळाडूंशी बोलतो की नाही. पण मी अस ऐकले आहे की, आशिया कप स्पर्धेत जेव्हा रोहित शर्मा कर्णधार होता. तेव्हा तो सर्व खेळाडूंशी बोलायचा. Cricbuzz या वेबसाईटशी बोलताना सेहवागने धोनीच्या रोटेशन पॉलिसीचा हवाला दिला. धोनीच्या काळात गोष्टी मीडियातून समजायच्या. मला आशा आहे की विराटच्या काळात असे होत नसले.
वाचा-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्यानंतर तो पहिल्या ११ जणांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात पंतला संघात स्थान न दिल्याबद्दल सेहवाग म्हणाला, पंतला खेळवले जात नाही तर तो धावा कसा करेल. जर तुम्ही सचिन तेंडुलकरला बाहेर बसवले तर तो धावा करू शकणार नाही. तुम्हाला वाटत असेल पंत मॅच जिंकून देऊ शकतो तर त्याला खेळवत का नाही? का तर तो नियमीत कामगिरी करत नाही म्हणून, असा सवाल सेहवागने केला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times