वेलिंग्टन: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये शानदार विजय मिळवला. भारताचा सुपर ओव्हरमधील हा सलग दुसरा विजय ठरला. तर न्यूझीलंडला पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये अपयश आले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. या विजयानंतर आंतरराष्ट्रीय परिषदेने भारतीय संघाला दंड केला आहे.

वाचा-

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यातनंतर आयसीसीने भारतीय संघाला ४० टक्के इतका दंड केला आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात भारताने धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल हा दंड करण्यात आला. आसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉडने विराट कोहलीसह संघाला ४० टक्के दंड केला. नियमित वेळेपेक्षा दोन षटके मागे होता. त्यामुळे हा दंड करण्यात आला.

वाचा-

भारतीय संघाने नियम २.२२ चे उल्लंघन केले आहे. ही नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी करण्यासंदर्भातील आहे. या नियमानुसार प्रत्येक ओव्हर मागे खेळाडूंच्या मानधनातून २० टक्के रक्कम दंड म्हणून आकारला जातो, असे आयसीसीने म्हटले आहे.

वाचा-

भारताचा कर्णधार विराट कोहली याने ही बाब मान्य केली आणि आयसीसीने केलेला दंड स्विकारला. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी करण्याची गरज पडली नाही.

वाचा-

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांतील पाचवा आणि अखेरचा सामना उद्या (रविवारी) होणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here