केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत स्टाइल धावबाद पाहायला मिळाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या या सामन्यात हा प्रकार घडला. यामुळे एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

वाचा-

पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यात अफगाणिस्तानचा गोलंदाज नूर अहमद लकनवाल याने पाकिस्तानच्या मोहम्मद हुरैरा याला मंकडिंग स्टाइल धावबाद केले. सामन्यातील २८व्या षटकात नूरने हुरैराला बाद केले. हुरैरा नॉन स्ट्राइकरवर उभा होता. गोलंदाजीला आलेल्या नूरने चेंडू टाकण्याआधी क्रिज सोडलेल्या हुरैराला बाद केले.

वाचा-

नूरने चेंडू विकेटला लावला आणि अंपायरकडे अपील केली. मैदानावरील अंपायरने थर्ड अंपायरला विचारणा केली. क्रिकेटच्या नियमानुसार थर्ड अंपायरने हुरैराला बाद दिले. त्याने ७६ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ६४ धावा केल्या. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत १८९ धावा केल्या होत्या. पाकिस्ताने ४१.१ ओव्हर आणि ४ विकेटच्या बदल्यात लक्ष्य पार केले आणि सामना ६ विकेटनी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. हुरैराला सामनावीर पुरस्कार मिळाला.

वाचा-

उपात्यं फेरीत भारताविरुद्ध सामना

अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानचा मुकाबला भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना ४ फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल.

वाचा-

काय आहे ‘मंकडिंग स्टाइल’ धावबाद

फलंदाज जर गोलंदाजाच्या हातातून चेंडू टाकण्याआधी क्रिजमधून बाहेर पडला आणि तेव्हा जर गोलंदाजाने आउट केले तर फलंदाज बाद होऊ शकतो. १३ डिसेंबर १९४७ रोजी विनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बिल ब्राउन यांना अशा प्रकारे बाद केले होते. त्यामुळे त्याला मंकडिंग स्टाइल असे म्हटले जाते.

अश्विनने केले होते मंकडिंग स्टाइलने धावाबाद

आयपीएलच्या गेल्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना आर. अश्विनने राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर याला मंकडिंग स्टाइलने बाद केले होते. १९ वर्षा खालील वर्ल्ड कपमधील या प्रकारानंतर काहींनी अशा पद्धतीने बाद करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी क्रिकेटच्या निमानुसार फलंदाज बाद ठरतो असे म्हटले आहे. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅडरसन याने आयसीसी आणि एमसीसीला टॅक करत हा नियम रद्द करता येणार नाही का असा प्रश्न विचारला आहे.

अॅडरसनच्या या पोस्टवर अश्विनने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here