नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भन्नाट कामगिरी केली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-०ने असा विजय मिळवला आहे. पण फक्त भारताचा मुख्य संघच नाही तर भारताचा ज्युनिअर संघ देखील न्यूझीलंडमध्ये आहे आणि ते देखील शानदार अशी कामगिरी करत आहेत.

वाचा-

भारताचा अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. हनुमा विहारीच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सराव सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवला होता. भारतीय संघाला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजय मिळवता आला नसला तरी त्यांनी शानदार कामगिरी केली होती. आता कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दमदार खेळी केली.

वाचा-

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या याने द्विशतक झळकावले. तर कर्णधार आणि प्रियांक पंचाल यांनी शतकी खेळी केली. सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचा पहिला डाव २१६ धावांवर संपुष्ठात आला. गिलने पहिल्या डावात ८३ तर विहारीने ५१ धावा केल्या. पहिल्या डावात न्यूझीलंडने ५६२ धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडकडून डेन क्लीनवर याने १९६, मार्क चॅममॅनने ११४ तर विल यंग याने ५४ धावा केल्या.

वाचा-

दुसऱ्या डावात भारताची सुरूवात खराब झाली. एक धाव संख्येवर भारताची पहिली विकेट पडली. त्यानंतर अभिमन्यू ईश्वरन २६ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर प्रियांक पंचाल आणि शुभमन गिल यांनी १८० धावांची भागिदारी केली. पंचाल ११५ धावांवर बाद झाला. त्यानंतर गिल आणि विहारी यांनी संघाला सुस्थितीत नेले. गिलने २७९ चेंडूत २२ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद २०४ धावा केल्या. तर विहारीने ११३ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह शतक केले. गिल, पंचाल आणि विहारी यांच्या खेळीमुळे सामना ड्रॉ झाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here