जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू असलेल्या जोकोविचने अंतिम सामन्यात सामन्यात थिमचा ६-४, ४-६, २-६, ६-३,६-४ असा पराभव केला.
याआधी जोकोविच आणि थिम यांच्यात १० लढती झाल्या होत्या. त्यापैकी सहा वेळा जोकोविचने तर ४ वेळा थिमने विजय मिळवला होता. पहिला गेम जिंकल्यानंतर जोकोविचचा पुढच्या दोन गेममध्ये पराभव झाला. त्यानंतर जोकोविचने दोन गेम जिंकत ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले.
जोकोविचने आठव्यांदा पहिल्यांदा वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले. जोकोविचच्या नावावर ऑस्ट्रेलियन ओपनचे सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम आहे. २०११ ते २०१३ या काळात सलग तीन विजेतेपद पटकावण्याचा रेकॉर्ड देखील त्याच्याच नावावर आहे.
३२ वर्षीय जोकोविचचे करिअरमधील हे १७वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. थिमचे ही तिसरी ग्रँडस्लॅम फायनल होती. याआधी २०१८ आणि २०१९मध्ये तो फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times