न्यूझीलंडविरुद्ध माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला फलंदाजीकरताना मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी देखील आला नाही. त्याच्या ऐवजी केएल राहुल याने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली. आता उर्वरित न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार आहे.
वाचा-
बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडविद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे आणि त्यानंतर होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित खेळणार नाही. न्यूझीलंड दौऱ्याआधी जलद गोलंदाज इशांत शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर आता रोहितला संघाबाहेर जावे लागत आहे. शिखरच्या ऐवजी वनडे संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली होती. आता रोहितच्या ऐवजी कोणाली संधी मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
वाचा-
पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात विराट कोहलील विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे
नेतृत्व करत होता. रोहितने ४१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६० धावा केल्या. पण दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. या खेळीत रोहितने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मधील अर्धशतक झळकावले. रोहितने टी-२० मध्ये २५ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याबाबत रोहितने विराट कोहलीला मागे टाकले.
वाचा-
विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये २४ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल आणि पॉल स्टर्लिंग यांनी प्रत्येकी १७ वेळा अशी कामगिरी केली. तर ऑस्ट्रेल्याच्या डेव्हिड वॉर्नरने १५ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times