पाहा:
वाचा:
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं न्यूझीलंडपुढं ३४७ धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून श्रेयस अय्यर यानं धडाकेबाज शतक ठोकलं. तर, कर्णधार विराट कोहली व लोकेश राहुल यांनी अर्धशतकं झळकावली. भारतीय फलंदाजांपुढं न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा मारा निष्प्रभ ठरला. अखेर ५० षटकांत भारतानं ३४७ धावांपर्यंत मजल मारली. भारताची धावसंख्या पाहता हा सामना एकतर्फी होईल की काय, अशी शंका होती. मात्र, टी-ट्वेंटीतील पराभवानंतर विजयाच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अजिबात डोकं वर काढू दिलं नाही. सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत किवी फलंदाजांनी धावांची गती उत्तरोत्तर वाढवत नेली. शेवटच्या षटकांमध्ये न्यूझीलंडचे दोन फलंदाज झटपट बाद झाल्यामुळं भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, शतकवीर रॉस टेलर यानं अखेरपर्यंत किल्ला लढवत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. ४८.१ षटकांत न्यूझीलंडनं भारताचं ३४७ धावांचं लक्ष्य पूर्ण केलं.
वाचा:
वाचा:
न्यूझीलंडकडून रॉस टेलर () यानं ८४ चेंडूत नाबाद १०९ धावा कुटल्या. तर, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम यांनी अनुक्रमे ७८ व ६९ धावा केल्या. त्यांना मार्टिन गप्टील (३२) यानं चांगली साथ दिली. भारताकडून कुलदीप यादवनं दोन बळी घेतले. तर, मोहम्मद शामी व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times