हॅमिल्टन: भारतीय संघाचा कर्णधार त्याची फलंदाजी, मैदानावरील आक्रमकपणा आणि नेतृत्वामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात विराट आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. विराटने न्यूझीलंड दौऱ्यात अफलातून क्षेत्ररक्षण केले आहे. पहिल्या वनडेत विराटने अशीच अफलातून फिल्डिंग केली आणि त्याची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने देखील घेतली.

वाचा-

विराटच्या फिटनेसमुळे तो मैदानावर सर्वच बाबतीत आघाडीवर असतो. काहीच दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कॅच पकडने किंवा चपळतेने एखाद्याला धावबाद करणे हे सर्व फिटनेसवर अवलंबून असते. या फिटनेसच्या जोरावरच विराटने पहिल्या वनडेत शानदार फिल्डिंग करत विकेट घेतली. न्यूझीलंडच्या डावात निकोल्सने ऑफ साइडला एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच विराटने कव्हर्सच्या धाव घेतली आणि चेंडू स्टंपवर थ्रो केला.

वाचा-

निकोल्सने धावबाद होऊ नये म्हणून उडी मारली पण विराटच्या थ्रो पुढे तो जिंकू शकला नाही. विराटची ही फिल्डिंग पाहून अनेकांना दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी र्‍होड्सची आठवण आली. जॉन्टीने देखील पाकिस्तानचा फलंदाज इंझमाम उल हक याला असेच धावबाद केले होते.

अर्थात विराटची ही कामगिरी भारताला विजय मिळून देऊ शकली नाही. भाराने ३४७ धावांचा डोंगर उभा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरने १०३ धावांची शतकी खेळी केली तर लोकेश राहुलने नाबाद ८८ आणि कर्णधार विराट कोहलीने ५१ धावा केल्या. भारताने ४ बाद ३४७ धावा केल्यानंतर न्यूझीलंडने ११ चेंडू आणि ६ गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने शतक तर टॉम लाथम (६९) आणि हेनरी निकोल्स (७८) यांनी अर्धशतकी खेळी केली.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here