पाकिस्तान संघाचा १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धचा हा सलग चौथा पराभव ठरला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर चाहत्यांनी त्यांचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला.
वाचा-
पाकिस्तान बोर्डाने ट्विटवर पाकिस्तान संघाचा पराभव झाल्याचे सांगितले. त्यावर देशातील चाहत्यांनी राग व्यक्त केला. एका युझर्सने तुम्हाला लाज वाटत नाही का, तर अन्य एकाने मौका, मौका, सुभानअल्लाह हम कब खौफ से निकलेंगे इंडिया से, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा-
दुसऱ्या एका युझरने अभिनंदन, पाकिस्तानचा १९ वर्षाखालील क्रिकेट संघ पाकिस्तान एअर पोर्टसाठी पात्र ठरला, असा चिमटा काढला आहे.
वाचा-
पाकिस्तानच्या चाहत्यांकडून अशा प्रतिक्रिया आल्यावर साहजिकच भारतीय चाहते देखील मागे राहिले नाहीत.
वाचा-
वाचा-
१९ वर्षाखालील वर्ल्ड कपमधील भारत-पाक लढती
१९८८-पाकिस्तानचा ६८ धावांनी विजय
१९९८-भारताचा ५ विकेटनी विजय
२००२- पकिस्तानचा २ विकेटनी विजय
२००४- (सेमीफायनल) पाकिस्तानचा ५ विकेटनी विजय
२००६- (फायनल) पाकिस्तानचा ३८ धावांनी विजय
२०१०- (उपांत्य पूर्व) पाकिस्तानचा २ विकेटनी विजय
२०१२- (उपांत्य पूर्व) भारताचा १ विकेटनी विजय
२०१४- भारताचा ४० धावांनी विजय
२०१८- भारताचा २०३ धावांनी विजय
२०२०- भारताचा १० विकेटनी विजय
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times