ऑकलंड येथील ईडन पार्कवर गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. या मैदानावर न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ख्रिस केन्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने २७ सामन्यात ३३ विकेट घेतल्या आहेत. भारताचा विचार केल्यास जवागल श्रीनाधने या मैदानावर ४ सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत. ईडन पार्कवर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने २८ धावा देत ६ विकेट घेतल्या होत्या.
वाचा-
संघात बदल निश्चित
पहिल्या वनडेतील पराभवानंतर भारतीय संघात बदल अपेक्षित आहेत. टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकूरला नवदीप सैनीच्या जागी संधी दिली. पण तो फार महाग ठरला. पहिल्या वनडेत ९ षटकात ८.८८च्या सरासरीने ८० धावा दिल्या. त्यामुळे दुसऱ्या वनडे सैनीला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
ईडन पार्कवर जलद गोलंदाजांना अधिक वाव असल्यामुळे भारतीय संघ जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी या तिघांशिवाय आणखी एका जलद गोलंदाजाला संधी देऊ शकतो. यात शार्दुल आणि शिवम दुबे यांच्यापैकी एकाचा विचार करावा लागले. संघ व्यवस्थापन मुंबईचा अष्ठपैलू शिवमला संधी देऊ शकतो. कारण तो गोलंदाजीसोबत फलंदाजी देखील करू शकतो. कुलदीप यादवने पहिल्या सामन्यात १० षटकात ८४ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्या ऐवजी शिवमला स्थान मिळू शकते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times