वाचा-
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेडुलकरने ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेनचे कौतुक केले आहे. मार्नसची फलंदाजी पाहिल्यानंतर मला माझी आठवण येते असे सचिन म्हणाला. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतक केली आहे. मार्नसची अॅशेस मालिकेतील फलंदाजी पाहिल्यानंतर छान वाटल्याचे सचिन म्हणाला. सध्याच्या क्रिकेटमध्ये कोणाची फलंदाजी पाहिल्यावर स्वत:ची आठवण येते या प्रश्नाला उत्तर देताना सचिनने मार्नसचे नाव घेतले. मार्नसचा फुटवर्क जबरदस्त असल्याचे सचिन म्हणाला.
वाचा-
इंग्लंडविरुद्ध जोफ्रा आर्चरचा चेंडू डोक्याला लागल्यानंतर मार्नसने १५ मिनिटे फलंदाजी केली होती. तेव्हाच मी म्हटले हा विशेष खेळाडू आहे. त्याचा फुटवर्क चांगला आहे आणि तो शारिरीक नाही तर मानसिक असतो. जर तुम्ही सकारात्मक नसाल तर तुमचे पाय चालत नाहीत. मार्नस मानसिकदृष्ट्या मजबुत असल्याचे सचिनने सांगितले.
वाचा-
सचिनने १९९२ मध्ये सिडनी मैदानावर १८ व्या वर्षी नाबाद शतकी खेळी केली होती. तेव्हा सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनला पाहिल्यानंतर मला माझी आठवण येते असे म्हटले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times