नवी दिल्ली: वनडे मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड काही दिवसांपूर्वी झाली. या कसोटी संघाच्या निवडीवरून अजूनही चर्चा सुरू आहे आणि चर्चेचे कारण ठरला आहे तो .

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुलने शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर पहिल्या वनडेत देखील राहुलने आक्रमक खेळी केली. पण इतक्या शानदार कामगिरीनंतर देखील त्याचा कसोटी संघात विचार केला गेला नाही. त्यामुळे राहुलच्या अनेक चाहत्यांनी बीसीसीआय आणि निवड समितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा-

राहुलने टी-२० मालिकेत ५६च्या सरासरीने २२४ धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. तर पहिल्या वनडेत देखील त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली. पाचव्या क्रमांकावर येवून राहुलने ६४ चेंडूत ८८ धावा केल्या. भारतीय संघातील अन्य कोणताही फलंदाजापेक्षा राहुलची कामगिरी सरस असताना देखील त्याला कसोटी संघात स्थान दिले नाही.

वाचा-

पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवड समितीने राहुलला संघात स्थान न देण्यामागे त्याची कसोटीमधील कामगिरीचा विचार केला आहे. कसोटीमध्ये गेल्या १२ डावात त्याने एकही अर्धशतक केले नाही. इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानावर १४९ ही त्याची अखेरची सर्वोत्तम खेळी होती. अखेरच्या १२ डावातील अपयशामुळे सध्या टी-२० आणि वनडेत दमदार कामगिरी करून देखील त्याची कसोटी संघात निवड झाली नाही. याउटल न्यूझीलंड अ विरुद्ध खेळताना द्विशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलचा कसोटी संघात विचार करण्यात आला.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here