नवी दिल्ली: व्हायरसमुळे भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा दौरा रद्द केला आहे. हॉकी इंडिया समोर आता ऑलिम्पिकच्या तयारीसाठी अन्य दौऱ्याचा नियोजन करण्याचे आव्हान आहे.

भारतीय महिला संघ येत्या १४ ते २५ मार्च दरम्यान चीनच्या दौऱ्यावर जाणार होता. पण चीनमध्ये करोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत ३००हून अधिक लोकांचा बळी केला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हॉकी संघाने दौरा रद्द केला.

वाचा-

आम्हाला चीनमध्ये खेळायची इच्छा होता. पण करोना व्हायरसमुळे दौरा रद्द झाला. अन्य संघांसोबत सामने होऊ शकत नाहीत कारण ते प्रो हॉकी लीग स्पर्धेत खेळत आहेत, असे भारतीय संघांची कर्णधार राणीने सांगितले. हॉकी इंडिया आणि प्रशिक्षक पर्यायी दौऱ्याचा विचार करत आहेत. आम्हाला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मोठ्या संघाविरुद्ध खेळणे आवश्यक असल्याचे ती म्हणाली.

करोना व्हायरसमुळे चीनमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. अन्य काही देशात देखील करोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारताने देखील यावर लक्ष ठेवले असून सरकारने ६४० विद्यार्थ्यांना माघारी बोलवले आहे.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here