नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रविवारी होणाऱ्या फायनल मॅचमध्ये भारताची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे पाचवे विजेतेपद ठरले. भारताकडून या स्पर्धेत यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.

उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध यशस्वीने शानदार शतकी खेळी केली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात सर्वांची नजर त्याच्यावर आहे. १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेचा विचार केल्यास सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय फलंदाजाच्या नावावर आहे.

वाचा-

एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या याच्या नावावर आहे. शिखरने २००४च्या स्पर्धेत ५०५ धावा केल्या होत्या. १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. २००४ पासून हा विक्रम शिखरच्या नावावर आहे.

वाचा-

या वर्ल्ड कप स्पर्धेत देखील शिखरचा हा विक्रम कोणी मोडेल असे वाटत नाही. भारताच्या यशस्वीने आतापर्यंत ३१२ धावा केल्या आहेत. शिखरचा विक्रम मागे टाकण्यासाठी यशस्वीला १९३ धावांची गरज असते आणि एका सामन्यात इतक्या धावा करणे जवळपास अशक्य आहे. या स्पर्धेत २०१८ मध्ये भारताच्या शुभमन गिलने ३७२ तर सर्फराज खान याने २०१६ मध्ये ३५५ धावा केल्या होत्या.

१९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

शिखर धवन- ५०५ (२००४)
शुभमन गिल- ३७२ (२०१८)
सर्फराज खान- ३५५ (२०१६)
चेतेश्वर पुजारा- ३४९ (२००६)
रवनीत- ३४० (२०००)
यशस्वी जयस्वाल- ३१२ (२०२०)*

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here