पोटशेफस्ट्रूम: स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. भारताने पाकिस्तानचा तर बांगलादेशने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी दोन्ही संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होईल. भारतीय संघ विक्रमी पाचव्या तर बांगलादेश पहिल्या विजेतेपदासाठी लढेल.

वाचा-

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर बांगलादेशची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ही तिसऱ्या स्थानाची आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ४ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ३ वेळा भारताने तर एकवेळा बांगलादेशने बाजी मारली आहे. २०००, २००२, २००४ आणि २०१८ च्या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते.

वाचा-

भारताचा मोठा पराभव

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध ४ पैकी ३ लढतीत विजय मिळवला असला तरी २००२च्या स्पर्धेत झालेल्या लढतीत बांगलादेशने भारतावर खळबळजनक विजय मिळवला होता. तेव्हा बांगलादेशने भारताचा फक्त ७७ धावांवर ऑलआऊट केला होता आणि ३२.२ षटकात ८ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला होता. त्यानंतर २००४ आणि २०१८च्या लढतीत भारताने विजय मिळवला होता.

वाचा-

भारताचा आतापर्यंतचा वर्ल्ड कपमधील प्रवास

श्रीलंकाविरुद्ध ९० धावांनी विजय
जपान विरुद्ध १० विकेटनी विजय
न्यूझीलंडविरुद्ध ४४ धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांनी विजय
सेमीफायनल- पाकिस्तानविरुद्ध १० विकेटनी विजय

बांगलादेशचा आतापर्यंतचा वर्ल्ड कपमधील प्रवास

झिम्बाब्वेविरुद्ध ९ विकेटनी विजय
स्कॉटलंडविरुद्ध ७ विकेटनी विजय
पाकिस्तानविरुद्ध सामना पावसामुळे रद्द
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०४ धावांनी विजय
सेमीफायनल- न्यूझीलंडविरुद्ध ६ विकेटनी विजय

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here