वाचा-
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग-२ स्पर्धेतील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात नेपाळच्या याने झळकावण्याचा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय वनडेत याआधी सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम नेपाळच्या रोहित कुमार पौडेल याच्या नावावर होता. त्याने १६ वर्ष १४६ व्या दिवशी अमेरिकेच्या विरुद्ध अर्धशतक केले होते. तर कुशलने १५ वर्ष ३४० व्या दिवशी वनडेत अर्धशतक केले. याबाबत कुशलने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहीद आफ्रिदी यांना मागे टाकले.
वाचा-
कुशलने सहाव्या क्रमांकावर येत ४९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्थात त्यानंतर तो बाद देखील झाला. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने १६ वर्ष २१७ दिवसात तर सचिनने १७व्या वर्षी आंतरराष्ट्रीय वनडे मध्ये अर्धशतकी खेळी केली होती. कसोटीमध्ये सचिनने वयाच्या १६ व्या वर्षीच अर्धशतक केले होते.
वाचा-
अमेरिकेच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात नेपाळने ४९.२ षटकात सर्वबाद १९० धावा केल्या. कुशलसह बिनोद भंडारीने देखील अर्धशतक केले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times