पॉटशेफस्ट्रूम: स्पर्धेतील सर्वात यशस्वी ठरलेला भारतीय संघाची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा तर एकूण पाचव्यांदा विजेतेपदासाठी तर बांगलादेश पहिल्या जेतेपदासाठी अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

बांगलादेश संघाचे अंतिम फेरीत पोहोचणे अनेकांसाठी धक्कादायक आहे. कारण त्यांनी उपांत्य पूर्व फेरीत दक्षिण आफ्रिका आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडसारख्या संघाचा पराभव केला आहे. हे दोन्ही संघ तुलनेने अधिक बलवान मानले जातात.

वाचा-

हे आहेत एक्स फॅक्टर

भारतीय संघासाठी १९ वर्षीय सुशांत मिश्रा हा एक्स फॅक्टर ठरू शकतो. जलद गोलंदाज सुशांतने या स्पर्धेतील ४ सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांनी स्वत:चे कौशल्य दाखवले. सुशांतच्या शॉर्ट पिच आणि बाउंसर चेंडूमुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकता आले नाही.

वाचा-

बांगलादेशचा विचार केल्यास तौहिद ह्रदॉय हा महत्त्वाचा खेळाडू आहे. फलंदाज असलेल्या तौहिदने ५ सामन्यात ११४ धावा केल्या आहेत. मोठ्या सामन्यात त्यांने शानदार खेळी केली. तौहिदने आफ्रिकेविरुद्ध ५० तर न्यूझीलंडविरुद्ध ४० धावांची महत्त्वाची खेळी केली होती. दबावाच्या परिस्थितीत त्याने कामगिरी उंचावली आहे.

कर्णधार अकबर अलीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशकडे गमवण्यासारखे काहीच नाही. त्यांच्या प्रत्येक खेळाडूला माहित आहे की जर विजय मिळवला तर ते इतिहास घडवतील. भारताचा विचार केल्यास आतापर्यंत ४ विजेतेपद मिळवणाऱ्या संघाने कधीच सलग दोन जेतेपद मिळवली नाहीत.

वाचा-

१९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ४ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ३ वेळा भारताने तर एकवेळा बांगलादेशने बाजी मारली आहे. २०००, २००२, २००४ आणि २०१८ च्या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here