पॉन्टिंग संघाने प्रथम फलंदाजी करत १० षटकात ५ बाद १०४ धावा केल्या. पॉन्टिंगच्या संघाकडून वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याने ११ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. तर कर्णधार पॉन्टिंगने नाबाद २६ धावा केल्या. याशिवाय मॅथ्यू हेडनने १६ धावांचे योगदान दिले.
वाचा-
गिलख्रिस्ट संघाकडून वेस्ट इंडिजचा दिग्गज गोलंदाज कोर्टनी वॉल्श, भारताचा युवराज सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
वाचा-
विजयासाठी १०५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गिलख्रिस्ट संघाला १० षटकात ६ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता आली. गिलख्रिस्ट संघाकडून शेन वॉटसन याने सर्वाधिक ९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३० धावा केल्या. सायमंड्सने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावा केल्या.
वाचा-
या सामन्यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रिकी पॉन्टिंग संघाचा प्रशिक्षक होता. या सामन्याच्या तिकीट विक्रीतून मिळालेला पैसा ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीतील पीडितांना दिला जाणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times