नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय परिषद अर्थात जागतिक स्पर्धांसाठीच्या नियमात एक मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. जर आयसीसीने बदल केला तर त्याचा फटका भारतीय क्रिकेट संघाला देखील बसण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि अन्य मोठ्या स्पर्धांसाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची संख्या कमी करण्याचा आयसीसीचा विचार आहे. सध्या सपोर्ट स्टाफची संघ्या २५ इतकी असून ती २३ करण्याचा आयसीसीचा विचार आहे. याचा अर्थ असा एखाद्या संघासोबत खेळाडूंसह अन्य सदस्य मिळून फक्त २३ जण असतील.

वाचा-

आयसीसीने नियमात बदल केल्यास त्याचा फटका भारतीय संघाला बसू शकतो. भारतीय संघात खेळाडूंसह ३० जण असतात. याशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाला देखील या नियमाचा फटका बसू शकतो. आयसीसीद्वारे आयोजित स्पर्धेत इंग्लंडच्या संघात २८ सदस्य असतात. सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासोबत २८ सदस्य आहेत. यात १५ खेळाडू, ४ प्रशिक्षक, दोन थ्रो डाऊन स्पेशालिस्ट, एक ट्रेनर, एक फिजिओ, दोन मसाजर, एक मॅनेजर, एक लॅजेस्टिक मॅनेजर आणि एका मीडिया मॅनेजरचा समावेश असतो.

वाचा-

बेंगळुरू मिररने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत हा नियम लागू करण्यात आला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हा नियम लागू केला जाणार आहे.

वाचा-
या नियमामुळे खर्च कमी होईल असे आयसीसीचे म्हणणे आहे. नव्या नियमानुसार भारतीय संघाला अतिरिक्त खेळाडू सोबत ठेवता येणार नाहीत.

२०१५च्या वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १६वा खेळाडू धवल कुलकर्णीला घेतले होते. तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात देखील १६वा खेळाडू म्हणून सोबत होता. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आयसीसीच्या परवानगीनंतर ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला होता.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here