पॉटशेफस्ट्रूम: आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने बांगलादेशला १७८ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने संयमी खेळी केली. त्याने धावा ८८ धावा केल्या. भारतीय संघ विक्रमी पाचव्या तर बांगलादेश पहिल्या विजेतेपदासाठी खेळत आहे.

बांगलादेशचा कर्णधार अलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. पहिली दोन षटके त्यांनी निर्धाव टाकली. सातव्या षटकात दिव्यांश सक्सेनाला २ धावांवर बाद करत अविशेक दासने भारताला पहिला धक्का दिला. १० षटकात भारताच्या १ बाद २३ धावा झाल्या होत्या. दिव्यांशच्या जागी आलेल्या तिलक वर्माने यशस्वी सोबत दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी केली. ही जोडी भारताला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाईल असे वाटत असताना वर्मा ३८ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार प्रियम गर्ग ७ धावा करून माघारी परतला. दरम्यान, यशस्वीने स्पर्धेतील चौथे अर्धशतक पूर्ण केले.

वाचा-

यशस्वीने बांगलादेशच्या गोलंदाजांचा नेटाने मुकाबला केला. पण ८८ धावांवर तो बाद झाला. त्याला शोरिफुल इस्लामने बाद केले. त्यानंतर आलेला सिद्धेश वीर शोरिफुलने दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद केले.

त्यानंतर भारतीय फलंदाजांनी मैदानात हजेरी लावण्याचे काम केले. यशस्वी बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १५६ होती. त्यानंतर १६ धावात भारताने ५ विकेट गमावल्या. अखेर भारताने षटकात सर्व बाद १७७ धावा केल्या. बांगलादेशकडून दासने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. शोरिफुल इस्लामने दोन तर शाकीब आणि रकीब उल-हसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here