नसीमने सर्वात कमी वयात हॅटट्रिक घेण्याचा विक्रम केला. त्याने १६ वर्ष ३५९ दिवशी कसोटीत हॅटट्रिक घेतली. पाकिस्तानकडून ४१वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या नसीमने ३ चेंडूवर ३ विकेट घेतल्या. त्याने चौथ्या चेंडूवर नजमुल हुसैन शंतो याला बाद केले. त्यानंतर आलेल्या तइजुल इस्लाम याची विकेट घेतली आणि महमदुल्लाची बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली.
वाचा-
संघाकडून २००२ नंतर प्रथमच एका गोलंदाजाने हॅटट्रिक घेतली आहे. करिअरचा पाचवा कसोटी सामना खेळणाऱ्या नसीमने एका कसोटी सामन्यात ५ विकेट घेणारा सर्वात तरुण गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
कसोटीत पाकिस्तानकडून हॅटट्रिक घेणारे गोलंदाज
वासीम अक्रम- श्रीलंकेविरुद्ध १९९८-९९
वासीम अक्रम- श्रीलंकाविरुद्ध १९९८-९९
अब्दुल रझाक- श्रीलंकाविरुद्ध १९९९-००
मोहम्मद शामी- श्रीलंकाविरुद्ध २००१-०२
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times