भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर १७८ धावांचे आव्हान दिले होते. त्यांच्या समलामीच्या जोडीने चांगली सुरूवात करून दिली. त्याच वेळी भारतीय गोलंदाजांनी मात्र खराब कामगिरी केली. अखेर संघाच्या मदतीला आता तो रवी बिश्नोई. त्याने बांगलादेशची अवस्था शून्य बाद ५४ वरून ४ बाद ६५ अशी केली.
वाचा-
बिश्नोईने प्रथम तांझिद हसनची विकेट घेत बांगलादेशला पहिला दणका दिला. त्यानंतर मोहमदुल हसन जॉयची बोल्ड घेत त्याला माघारी पाठवले. दोन विकेट गेल्यानंतर परवेझ इमॉनला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. रवीने नवा फलंदाज तौहीद ह्रदॉयची विकेट घेत बांगलादेशला तिसरा धक्का दिला. त्यापाठोपाठ शहादत हुसैनला रवी बिश्नोईच्या चेंडूवर विकेटकीपर ध्रुव जुरेलने बाद केले.
एका बाजूला रवीची शानदार गोलंदाजी सुरू असताना दुसऱ्या बाजूने त्याला कोणाची साथ मिळत नव्हती. पहिल्या काही षटकात खराब गोलंदाजीमुळे पंचांनी दोन वेळा ताकीद दिलेल्या सुशांत मिश्राने शमीम हुसैनची विकेट घेत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या अविशेक दासला बाद करत सुशांतने बांगलादेशची सहावी विकेट घेतली.
दास बाद झाल्यानंतर दुखापतीमुळे मैदान सोडलेला इमॉन पुन्हा खेळण्यास आला. त्याने कर्णधार अकबर अली सोबत ४१ धावांची भागिदारी केली. ही जोडी बांगलादेशला विजय मिळून देईल असे वाटत असताना यशस्वीने इमॉनला ४७ धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार अकबर अलीने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला आणि संघाला विजय मिळून दिला. बांगलादेशला विजयासाठी १५ धावा हव्या असताना पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला होता.
त्याआधी बांगलादेशचा कर्णधार अलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. पहिली दोन षटके त्यांनी निर्धाव टाकली. सातव्या षटकात दिव्यांश सक्सेनाला २ धावांवर बाद करत अविशेक दासने भारताला पहिला धक्का दिला. १० षटकात भारताच्या १ बाद २३ धावा झाल्या होत्या. दिव्यांशच्या जागी आलेल्या तिलक वर्माने यशस्वी सोबत दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी केली. ही जोडी भारताला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाईल असे वाटत असताना वर्मा ३८ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार प्रियम गर्ग ७ धावा करून माघारी परतला. दरम्यान, यशस्वीने स्पर्धेतील चौथे अर्धशतक पूर्ण केले.
यशस्वीने बांगलादेशच्या गोलंदाजांचा नेटाने मुकाबला केला. पण ८८ धावांवर तो बाद झाला. त्याला शोरिफुल इस्लामने बाद केले. त्यानंतर आलेला सिद्धेश वीर शोरिफुलने दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद केले.
वाचा-
त्यानंतर भारतीय फलंदाजांनी मैदानात हजेरी लावण्याचे काम केले. यशस्वी बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १५६ होती. त्यानंतर १६ धावात भारताने ५ विकेट गमावल्या. अखेर भारताने षटकात सर्व बाद १७७ धावा केल्या. बांगलादेशकडून दासने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. शोरिफुल इस्लामने दोन तर शाकीब आणि रकीब उल-हसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times