बांगलादेशच्या संघाने जे केलं, त्यासाठी कर्णधाराला जाहीर माफी मागावी लागली. सामना चालू असताना बांगलादेशचा गोलंदाज शोरीफुल इस्लामच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षकांनी अतिउत्साह दाखवला. बांगलादेश विजयी होत असतानाही इस्लाम कॅमेऱ्यासमोर काही तरी बोलत असल्याचं दिसून आलं. पण विजयानंतर या खेळाडूंनी हद्द पार केली.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बांगलादेशचा कर्णधार अकबर म्हणाला, ‘आमचे गोलंदाज जास्तच भावूक झाले आणि उत्साहात होते. सामन्यानंतर जे झालं ते दुर्दैवी होतं. भारतीय खेळाडूंनाही मी शुभेच्छा देतो. विश्वचषक जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. आम्ही गेल्या दोन वर्षात प्रचंड मेहनत केली, ज्याचं फळ मिळालं.’
भारताचा ०३ विकेटनी पराभव करत बांगलादेशने पहिल्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरले. भारताने विजयासाठी दिलेले १७८ धावांचे आव्हान बांगलादेशने ७ विकेटच्या बदल्यात पार केले. या पराभवामुळे भारताचे विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. कमी धावसंख्येच्या या सामन्यात भारताने बांगलादेशला विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडले.
भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर १७८ धावांचे आव्हान दिले होते. त्यांच्या सलामीच्या जोडीने चांगली सुरूवात करून दिली. त्याच वेळी भारतीय गोलंदाजांनी मात्र खराब कामगिरी केली. अखेर संघाच्या मदतीला आता तो रवी बिश्नोई. त्याने बांगलादेशची अवस्था शून्य बाद ५४ वरून ४ बाद ६५ अशी केली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times