न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला क्लीन स्वीप होणार नाही याची काळजी घ्यावी लागले. यजमान न्यूझीलंड संघाने आतापर्यंत पाच वेळा घरच्या मैदानावर विरोधी संघाचा क्लीन स्वीप केला आहे. २०१८मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांनी ५-० असा विजय मिळवला होता. २०१७ आणि २०१९ मध्ये बांगलादेशचा क्लीन स्वीप केला होता. तर २०१८ मध्ये श्रीलंकेवर ३-० असा विजय मिळवला होता.
वाचा-
भारतीय संघाचा विचार केल्यास त्यांनी ३१ वर्षात वनडेत कधीच क्लीन स्वीप स्विकारलेला नाही. भारताने १९८९ मध्ये अखेरची वनडे मालिका अशा पद्धतीने गमावली होती. त्या मालिकेत वेस्ट इंडिजने भारताचा ५-० असा पराभव केला होता. त्यानंतर २००६ मध्ये आफ्रिकेच्या दौऱ्यात भारताच पराभव झाला होता. तेव्हा ५ सामन्यांच्या मालिकेत ४ भारताने गमवल्या होत्या. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
वाचा-
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा ४ विकेटनी तर दुसऱ्या वनडेत भारताचा २२ धावांनी पराभव झाला होता. त्याआधी टी-२० मालिकेत भारताने न्यूझीलंडा ५-० असा पराभव केला होता. वनडे मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times