माउंट माँगनुई: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने २९६ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंड दौऱ्यात ही पहिली वेळ नाही जेव्हा राहुल भारतीय संघाच्या मदतीला धावून आला. तिसऱ्या वनडेतील राहुलच्या शतकी खेळीने एक नवा इतिहास रचला गेला आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. राहुल जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ६३ अशी होती. सलामीची जोडी पृथ्वी-मयांक आणि कर्णधार कोहली बाद झाले होते. राहुलने श्रेयस अय्यर सोबत चौथ्या विकेटसाठी १०० धावांची महत्त्वाची भागिदारी केली. त्याच बरोबर त्याने वनडेमधील चौथे शतक पूर्ण केले.

वाचा-

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. राहुलने ११३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावा केल्या.

वाचा-

राहुलच्या या शतकी खेळीने एक नवा इतिहास रचला गेला आहे. वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या भूमीवर शतक करणारा पहिला विकेटकीपर ठरला आहे. आशिया खंडाबाहेर २१ वर्षानंतर प्रथमच एका भारतीय विकेटकीपर आणि फलंदाजाने शतक केले आहे. याआधी राहुल द्रवीडने १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली होती.

वाचा-

भारतीय संघाकडून पाचव्या क्रमांकावर येत एखाद्या फलंदाजाने ३ वर्षानंतर शतक झळकावले आहे. राहुलच्या आधी धोनीने जानेवारी २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध १३४ धावा केल्या होत्या. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने नाबाद ८८ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात तो ४ धावांवर बाद झाला होता.

न्यूझीलंड दौऱ्या केएल राहुलने शानदार कामगिरी केली आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने ५६च्या सरासरीने २२४ धावा केल्या होत्या. त्यात २ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. टी-२० मालिकेत त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत कोणत्याही भारतीय विकेटकीपरला मालिकावीर पुरस्कार मिळाला नव्हता. विशेष म्हणजे अशी कामगिरी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला देखील करता आलेली नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here