मेलबर्न: ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी झालेल्या बुश फायर रिलीफ सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंनी उपस्थिती दाखवली. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील यात भाग घेतला होता. सचिनने रिकी पॉन्टिंग संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका स्विकारली होती. या सामन्यात पॉन्टिंग संघाकडून वेस्ट इंडिजचा महान फलंदाज खेळत होता. या सामन्यातील लाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुश फायर सामन्यात अॅडम गिलख्रिस्टने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पॉन्टिंग संघाने १० षटकात ५ बाद १०४ धावा केल्या. यात ब्रायन लाराने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. त्याने ११ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार मारले.

वाचा-
५० वर्षीय लाराने अनेक शानदार खेळी केल्या आहेत. पण निवृत्तीनंतर त्याला बुश फायर सामन्यात खेळताना पाहता आले. लाराच्या या धडाकेबाज खेळीच्या व्हिडिओला जवळ जवळ ४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

लाराने वेस्ट इंडिजकडून १३१ कसोटी ५२.८८ सरासरीने ११ हजार ९५३ धावा केल्या आहेत. त्यात ३४ षटके आणि ४८ शतकांचा समावेश असून नाबाद ४०० ही कसोटीमधील त्याची सर्वोच्च खेळी आहे. वनडे क्रिकेटमध्ये लाराने ४०.४८ च्या सरासरीने १० हजार ४०५ धावा केल्या आहेत. यात १९ शतकं आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. १६९ ही वनडेतील त्याची सर्वोच्च खेळी होती. लाराने नोव्हेंबर २००६ मध्ये कसोटीतून तर एप्रिल २००७ मध्ये वनडेतून निवृत्ती घेतली होती.

वाचा-
ऑस्ट्रेलियामध्ये मदतनिधी सामना खेळण्याची लाराची ही पहिली वेळ नाही. याआधी २५ वर्षांपूर्वी लाराने ऑस्ट्रेलियात एक मदतनिधी सामना खेळला होता. त्यावेळीच्या आठवणी ऑस्ट्रेलियाने शेअर केल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here