नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये अनेक अजब विक्रमांची नोंद होत असते. असाच एक अजब विक्रम एका भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर आहे. माजी कर्णधार यांचा आज ७१वा वाढदिवस असून या निमित्ताने टाकूयात त्यांच्या करिअरवर एक नजर…

माजी कर्णधार गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४९ रोजी झाला. त्यांनी भारताकडून १९६९ ते १९८३ पर्यंत कसोटी सामने खेळले. ९१ कसोटी सामन्यातून त्यांनी ६ हजार ८० धावा केल्या. २२२ ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. विश्वनाथ यांनी १४ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली आहेत.

वाचा-

कसोटीसह त्यांनी वनडेत देखील भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. २५ वनडे सामन्यात विश्वनाथ यांच्या नावावर ४३९ धावा असून ७५ धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. पार्ट टाईम गोलंदाज म्हणून कसोटीत त्यांनी एक विकेट देखील घेतली होती.

वाचा-

विश्वनाथ यांच्या नावावर एक अजब विक्रम नोंदला गेला आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शून्यावर आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारे ते पहिले क्रिकेटपटू आहेत. १९६९ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कानपूर येथे झालेल्या त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात ते शून्यावर बाद झाले. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी २५ चौकाराच्या मदतीने १३७ धावा केल्या होत्या. विश्वनाथ यांच्या इतका सुरेख स्क्वेअर कट आणि लेट कट कोणीच मारू शकत नाही, असे म्हटले जाते.

गुंडप्पा विश्वनाथ यांनी रणजी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. १९६७ साली त्यांनी म्हैसूरकडून खेळताना आंध्र प्रदेशविरुद्ध २३० धावा केल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here