वाचा-
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार हाताच्या कोपराला दुखपत झाली आहे. यामुळे मॅक्सवेल दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी तीन टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मॅक्सवेलच्या जागी संघात डार्सी शॉर्टचा समावेश केला गेला आहे.
वाचा-
ऑस्ट्रेलियात सुरू असेलल्या बिग बॅश लीग स्पर्धेत मेलबर्न स्टार्सचा कर्णधार असलेला मॅक्सवेल गुरुवारी एका सामन्यात जखमी झाला. या दुखापतीमुळे मॅक्सवेल ६ ते ८ आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे मॅक्सवेल आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाही असे दिसते.
वाचा-
३१ वर्षीय मॅक्सवेलला पंजाब संघाने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याला विकत घेण्यासाठी आयपीएलच्या लिलावात दिल्ली आणि पंजाब संघात जोरदार चढाओढ पाहायला मिळाली होती.
मानसिक आरोग्य ठीक नसल्याने मॅक्सवेलने काही महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली होती.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times