बेंगळुरू: इंडियन प्रिमिअर लीग स्पर्धेच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने बुधवारी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवरील प्रोफाइल फोटो आणि नाव काढून घेतले. आरसीबीने अचानक फोटो काढून घेतल्यामुळे संघाच्या चाहत्यांसह क्रिकेटपटूंना देखील आश्चर्य वाटले.
वाचा-
न्यूझीलंड दौऱ्यावरून परत येणाऱ्या युजवेंद्र चहल याने आरसीबीच्या या बदलावर प्रतिक्रिया दिली आहे. अरे आरसीबी ही काय गुगली आहे. तुमचा प्रोफाईल फोटो आणि इंस्टाग्राम पोस्ट कुठे गेली? असा प्रश्न चहलने विचारला.
वाचा-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूच्या संघाने त्यांच्या ट्विटर प्रोफाइलचे नाव बदलले आहे. तसेच डिसप्ले आणि कव्हर फोटो देखील हटवण्यात आला आहे. तर नावात बदल करत रॉयल चॅलेंजर्स असे ठेवण्यात आले आहे. अशाच प्रकारचा बदल इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील करण्यात आला आहे.
आरसीबीने सोशल मीडियावर हे बदल का केलेत याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. आयपीएलच्या १२ हंगामात आरसीबीला एकदाही विजेतपद मिळवता आले नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times