मुंबई: मधील पहिला सामना २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईत होणार आहे. दुसरा ३० मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब हा सामना दिल्लीत, तिसरा सामना बेंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार. आयपीएलचे हे संभाव्य वेळापत्रक जवळ जवळ २० दिवासांपूर्वी सर्व संघांना देण्यात आले होते. पण अद्याप आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नाही.

वाचा-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोलकाता आणि दिल्लीत येणाऱ्या पाहुण्या संघांच्या व्यवस्थापनात गोंधळ झाला आहे. यामुळे राजस्थान रॉयल्स संघाने काही सामने गुवाहाटीला शिफ्ट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अर्थात यावर एक जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

वाचा-
आयपीएलमधील सर्व कार्यक्रम लक्षात घेता संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यास कोणत्याच अडचणी नाहीत. तरी अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध झाले नाही यामागे काही अन्य कारण असल्याचे बोलले जात आहे. स्पर्धेत सामन्यांचे नियोजन करताना आठवड्याच्या अखेरच्या दिवशी दोन सामने खेळवण्याचे प्रमाण कमी करण्याची शक्यता आहे.

आयपीएल सुरू होण्याआधी एक ऑल स्टार सामना देखील होणार आहे. याशिवाय १८ आणि २१ मार्च रोजी बेंगळुरू येथे आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी काही भारतीय खेळाडू पाठवण्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा विचार आहे.

वाचा-
पण यावर काही संघांनी आक्षेप घेतला आहे. आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यातील सामना सुरू होण्याच्या फक्त १० दिवस आधी होणार आहे. यामुळे आयपीएलच्या प्रमोशन आणि अन्य तयारीवर परिणाम होऊ शकतो, असे संघांचे म्हणणे आहे.

या सर्व गोष्टींमुळे आयपीएलचे अंतिम वेळापत्रक तयार होण्यास वेळ लागत असल्याचे समजते. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार एकाच दिवशी दोन सामने (डबल हेडर) कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here