ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप विजेतपद मिळून देणारा क्लार्क सात वर्षाच्या वैवाहिक बंधनातून वेगळा झाला आहे. क्लार्क आणि कॅली यांना चार वर्षांची एक मुलगी आहे. मुलीचे नाव कॅलसे असे आहे. घटस्फोटासंदर्भातील माहिती स्वत: क्लार्कने बुधवारी दिली.
वाचा-
काही काळ वेगळे राहिल्यानंतर आम्ही दोघांनी हा अवघड निर्णय घेतला. आम्ही एकत्रपणे हा निर्णय घेतल्याचे क्लार्कने म्हटले आहे.
एकमेकांचा आदर करत हा निर्णय घेतला आहे. आमच्या दोघांसाठी चांगल्यासाठीच हा निर्णय घेतला. मुलीची काळची आम्ही दोघे मिळून घेणार आहोत, असे त्याने म्हटले आहे. क्लार्कने पोटगी म्हणून ४० मिलियन डॉलर देण्याचे निश्चित केले आहे. भारतीय चलनात विचार केल्यास ही रक्कम दोन अब्ज इतकी होते.
वाचा-
मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०१५चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर क्लार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ऑस्ट्रेलियाकडून ११५ कसोटीत त्याने २८ शतकांसह ८ हजार ६४३ धावा केल्या आहेत. तर २४५ वनडेत ८ शतके आणि ५८ अर्धशतकांसह ७ हजार ९८१ धावा केल्या आहेत.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times